महाराष्ट्र ग्रामीण

सिंधू पाणी करार स्थगित करताच पाकिस्तानी मंत्री भारतावर संतापले, भ्याड,अपरिपक्व,अन्यायकारक, कोण काय म्हणाले?

Indus Water Treaty Pakistan Reaction: द डॉन च्या वृत्तानुसार पाकिस्तानचे ऊर्जामंत्री म्हणाले,हा करार संपवणे म्हणजे जलयुद्ध आहे. हे अतिशय भ्याड आणि बेकायदेशीर पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय .

Pahalgam Terror Attack: जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या प्रत्येक दहशतवाद्याला उखडून टाकण्याचा इशारा दिला . बिहारमधील मधुबनी येथे त्यांनी संपूर्ण जगाला इंग्रजीत या हल्ल्यातील कोणालाही सोडले जाणार नाही असा कडक इशारा दिला .दरम्यान भारताने पाच मोठ्या घोषणा केल्या यातील सर्वात मोठी कारवाई म्हणजे सिंधू पाणी करार स्थगित करण्याबाबत.  (India Pakistan water treaty) या निर्णयाने आता पाकिस्तानमध्ये घबराट पसरली आहे . सिंधू नदी करारामुळे आता पाकिस्तानचे मंत्री या निर्णयावर व्यक्त होत आहे .या निर्णयावरून आता पाकिस्तानी मंत्र्यांनी संताप व्यक्त केला आहे .पाकिस्तानी मंत्र्यांनी या निर्णयाला भ्याड अपरिपक्व आणि अन्यायकारक असल्याचं म्हटलं आहे .

पहलगाम मधील पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कायदेशीर सर्जिकल स्ट्राइक करताना दुसऱ्याचा दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत पाच मोठे निर्णय घेतले .यामध्ये 65 वर्ष जुना सिंधू पाणी करार स्थगित करण्यात आला .तसेच अटारी चेक पोस्ट बंद करण्यात आला असून व्हिजा निलंबित करण्यात आला आहे .उच्चायुक्तांना काढून टाकण्यात आला आहे . सिंधू नदीच्या करारावर पाकिस्तानी मंत्र्यांनी संताप व्यक्त केला आहे .सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या भारताच्या निर्णयाला पाकिस्तानी मंत्र्यांनी भ्याड म्हटलं आहे .द डॉन च्या वृत्तानुसार पाकिस्तानचे ऊर्जामंत्री म्हणाले,हा करार संपवणे म्हणजे जलयुद्ध आहे. हे अतिशय भ्याड आणि बेकायदेशीर पाऊल असल्याचं त्यांनी म्हटलंय .

सिंधू नदीचा प्रत्येक थेंब आपला..पाकिस्तान मंत्री म्हणाले…

पाकिस्तानी मंत्री लेघारी म्हणाले,सिंधू नदीच्या प्रत्येक थेंबावर आपला हक्क आहे आणि त्यासाठी कायदेशीर राजकीय किंवा जागतिक पावले उचलावी लागली तरी आम्ही ती वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न करू. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आणि उपपंतप्रधान इशाक दार यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे .त्यांनी भारताची ही कृती अयोग्य असल्याचं म्हटलं आहे .

भारताची राग व्यक्त करण्याची पद्धत अयोग्य ‘इराक दर म्हणाले ..

पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दर म्हणाले,पहलगा महल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचा कोणताही पुरावा नाही.म्हणूनच भारताने अशा प्रकारे आपला राग व्यक्त करणे अयोग्य आहे .इशाक दार म्हणाले,भारत सरकारने घेतलेले निर्णय हे विचार न करता घेतलेले दिसतात.ते अपरिपक्व आणि अहंकाराने भरलेले आहेत असेही ते म्हणाले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button